भावनांचे व्यवस्थापन करता आले पाहिजे

By Admin | Updated: February 25, 2017 23:50 IST2017-02-25T23:50:18+5:302017-02-25T23:50:38+5:30

दवणे : केटीएचएममध्ये पारितोषिक वितरण

Emotions should be managed | भावनांचे व्यवस्थापन करता आले पाहिजे

भावनांचे व्यवस्थापन करता आले पाहिजे

नाशिक : जीवनात वेळेचे व पैशाचे व्यवस्थापन करण्यात बराच कालावधी लागतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रवीण दवणे यांनी केले. केटीएचएम महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात रावसाहेब थोरात सभागृहात दवणे बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस नीलिमा पवार, नाना महाले, कृष्णा भगत, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अ‍ॅड. एकनाथ पगार, पद्माकर पाटील, अलका गुंजाळ, महेश भामरे, डॉ. बी. व्ही. कापडणीस, प्रा. एस. के. शिंदे, उपप्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. पी. व्ही. कोटमे, डॉ. एम. बी. मत्सागर, एच. सी. पाटील उपस्थित होते. यावेळी वार्षिक अहवाल वाचन उपप्राचार्य डॉ. एम. बी. मत्सागर, प्रा. तुषार पाटील, वैष्णवी जोशी यांनी सादर केले.  यावेळी उपस्थितांच्या हस्ते विविध राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपर सादर करणाऱ्या प्राध्यापक तसेच पीएचडी, नेट , सेट उत्तीर्ण प्राध्यापक व विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावर क्रॉसकंट्री, आर्चरी तसेच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
 

Web Title: Emotions should be managed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.