आरोग्य विज्ञान विद्यपीठात बोर्ड आॅफ एक्झामिनेशनची शनिवारी तातडीची बैठक

By Admin | Updated: November 30, 2014 00:42 IST2014-11-30T00:41:27+5:302014-11-30T00:42:38+5:30

एमबीबीएस पेपटफुटी प्रकरणाची व्यापक चौकशी :

An emergency meeting of the Health Sciences Board of Examinations was held on Saturday | आरोग्य विज्ञान विद्यपीठात बोर्ड आॅफ एक्झामिनेशनची शनिवारी तातडीची बैठक

आरोग्य विज्ञान विद्यपीठात बोर्ड आॅफ एक्झामिनेशनची शनिवारी तातडीची बैठक

नाशिक : एमबीबीएस तृतीय वर्ष परीक्षेच्या इएनटी या विषयाच्या पेपरफुटीची विद्यापीठामार्फत व्यापक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ़ अरुण जामकर यांनी दिली़ शनिवारी याबाबत विद्यापीठामध्ये तातडीने बोर्ड आॅफ एक्झामिनेशनची (बीओई) बैठक घेऊन चर्चा करण्यात आली़ दरम्यान, याबाबतचे सत्य पोलीस तपासानंतरच बाहेर येणार असून, प्रश्नाचा संदेश नेमका कोणत्या मोबाइलवरून पाठविण्यात आला याबाबत माहिती मिळालेली नाही़ एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील कान, नाक, घसा (इएनटी)विभागाचा पेपर दुपारी असताना त्यातील उत्तरांचे एसएमएस सकाळीच फिरले. यातील ३० गुणांचे प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत उतरल्याने एमबीबीएसचा पेपर फुटल्याची शंका व्यक्त केली जात होती़ या पेपरफुटीबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठाचे कुलसचिव डॉक़ाशीनाथ गर्कळ, परीक्षा नियंत्रक डॉक़े.डी़चव्हाण, उपकुलसचिव नितीन कावेडे, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ़ स्वप्निल तोरणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली आहे़ या पेपरफुटी प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, या प्रश्नांबाबतचा संदेश परीक्षा सुरू होण्याअगोदर वा नंतर प्रसारीत झाला याचा खुलासा चौकशीनंतरच समजू शकणार असल्याचे कुलसचिव डॉ़ काशीनाथ गर्कळ यांनी सांगितले़ विद्यापीठ स्तरावरूनही याबाबत माहिती घेतली जात असून, चौकशी सुरू आहे़ तसेच कोणत्या मोबाइलवरून हे संदेश पाठविण्यात आले त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाते आहे़

Web Title: An emergency meeting of the Health Sciences Board of Examinations was held on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.