शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे संकटकाळी जनतेला मिळणार तात्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:57 IST

पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही ...

ठळक मुद्दे अपत्कालीन सुरक्षा : जगातील सर्वोत्तम संपर्काचे एकमेव साधनग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास एकाच वेळी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक लोकांना घटनेची माहीती अति तात्काळ

पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही जगातील सर्वोत्तम संपर्कयंत्रणा विकसित करण्यात आली असून या यंत्रणेची सामान्य जनतेसह शासकिय विभागांना माहीती व्हावी यासाठी पेठ येथे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेत ग्रामसुरक्षा समन्वयक डी. के. गोर्डे यांनी या जलद संपर्कयंत्रणेबाबत माहीती दिली. आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास एकाच वेळी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक लोकांना घटनेची माहीती अति तात्काळ कळवली जाईल. यामुळे ज्या ठिकाणी घटना घडली त्यांना मदत करणे सोपे जाणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसुरक्षा यंत्रणा विकिसत करण्यात येणार असून चोरी, दरोडा, आग, अपहरण, छेडछाड, वाहन चोरी, आदी आपत्कालीन घटनांसाठी तत्काळ मदत मिळवता येणार आहे.याप्रसंगी तहसीलदार हरिष भामरे, सभापती पुष्पा गवळी, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमति भुसावरे, प्राचार्य आर. बी. टोचे, वनपाल आर.एस. आहेर यांचेसह तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सुरक्षा रक्षक उपस्थित होते. एस. एल. शिंदे यांनी सुत्रसंचलन तर जी. एस. शेवाळे यांनी आभार मानले.काय आहेत ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वैशिष्टयेसंपूर्ण गावात स्वयंचिलत यंत्रणा, संपूर्ण भारतात १८००२७०३६०० हा एकच टोल फ्री नंबर, यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात परिसरातील नागरिकांना एकाच कॉलद्वारे सावध करू शकतो, दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता,ठिकाण कळणार असल्याने विनाविलंब मदत मिळू शकते, नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारीत होतात, एका गावातून चोरी करून चोर दुसऱ्या गावाच्या दिशेने पळून गेल्यास त्या गावालाही संदेशाद्वारे सावध करता येते, सरकारी कार्यालये, पोलीस ठाणे आदींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना सुचना देता येतात.या कारणासाठी मिळू शकेल मदतगंभीर अपघात, बिबट्याचा हल्ला, आग/ जळीत घटना, पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, लहान मुल हरवणे, अपहरण, चोरी, दरोडा, विषबाधा, सर्पदंश, महिलांची छेडछाड, याबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामसभा, घरपट्टी वसुली, सरकारी योजनांची माहीती, गॅस वाहन येणार असल्याची माहीती, रेशन-रॉकेल वितरण, पोलीओ लसिकरण, गरोदर माता तपासणी, शाळांचे कार्यक्र म, यात्रा सभा, आरोग्य शिबीरे, स्वच्छता अभियान आदी साठी वापर करता येऊ शकेल. पोलीस ठाणेतंर्गत येणाºया गावांना व पोलीस पाटलांना बैठकांचे संदेश, बंदोबस्त आदेश, चोरीच्या घटनेतील फरारी आरोपी आदींची माहीती देण्यासाठी या यंत्रणेचा वापर करून घेण्यात येणार आहे.