रावळगावी ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:25+5:302021-07-26T04:14:25+5:30

घटनास्थळी तत्काळ प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार राजपूत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान ...

Emergency demonstration against the backdrop of cloudburst in Rawalgaon | रावळगावी ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रात्यक्षिक

रावळगावी ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रात्यक्षिक

googlenewsNext

घटनास्थळी तत्काळ प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार राजपूत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान यांची पथके रवाना झाली आणि एखाद्या सुटीच्या दिवशी अशी घटना घडल्यास प्रशासन काय काळजी घेते याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात येऊन त्यांना तत्काळ अहवाल कळविण्यात आला. दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी रावळगाव येथे अतिवृष्टीमुळे २० ते २२ घरे पडून त्याखाली काही व्यक्ती दबल्या असल्याची शक्यता असल्याबाबत मोबाइलवर माहिती मिळाल्याचे गृहीत धरून प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष, मनपातील नियंत्रण कक्ष, पोलीस, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी एसडीआरएफ धुळे, सामान्य रुग्णालय, खासगी प्रयास हॉस्पिटल यांना दूरध्वनीवरून रावळगावात ढगफुटी झाली असून तत्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. जेसीबीचालक बच्छाव यांना तत्काळ घटनास्थळी बोलाविण्यात आले. प्रांत ४ वाजून २५ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले. आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेसह डॉ. दीपक निकम, डॉ. अमोल जाधव, रावळगावचे सरपंच महेश पवार, उपसरपंच भरत आखाडे, तलाठी महाले, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी शिरोळे घटनास्थळी रावळगावला पाेहोचले. त्यानंतर २० ते २५ मिनिटांनी गटविकास अधिकारी आले. ढगफुटीच्या प्रात्यक्षिकाबाबत सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यात आला, मात्र ग्रामस्थांमध्ये ढगफुटी आणि पाण्यात, मातीत अडकलेल्या ग्रामस्थांचीच चर्चा होती.

Web Title: Emergency demonstration against the backdrop of cloudburst in Rawalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.