नोकराकडून दीड लाख रुपयांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:14+5:302021-06-20T04:12:14+5:30

नागसेठीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ट्रेडिंग कंपनीत काम करणाऱ्या संशयित भगवान एकनाथ वाघ याच्याविरुद्ध दीड लाख रुपयांचा अपहार केल्याचा ...

Embezzlement of Rs 1.5 lakh from a servant | नोकराकडून दीड लाख रुपयांचा अपहार

नोकराकडून दीड लाख रुपयांचा अपहार

Next

नागसेठीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ट्रेडिंग कंपनीत काम करणाऱ्या संशयित भगवान एकनाथ वाघ याच्याविरुद्ध दीड लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागसेठीया नावाने ट्रेडिंग कंपनी असून, त्या कंपनीत वाघ नोकरदार म्हणून काम करतो. शुक्रवारी (दि.१८) सकाळी नागसेठीया यांनी खासगी बँकेत भरणा करण्यासाठी वाघ यांच्याकडे दीड लाख रुपये दिले होते. यामध्ये पाचशे रुपये दराच्या ३०० नोटा दिल्या होत्या. संशयित वाघ याने सदर रक्कम बँकेत भरणा न करता पैसे भरण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा हेल्मेटधारकांनी अंगावर लाल रंग ओतून सदर रक्कम चोरून नेल्याचा बनाव केला. या प्रकरणानंतर पोलिसांनी संशयित वाघ यांची कसून चौकशी केली. त्यावेळी रक्कम चोरी झाले नसल्याचे निष्पन्न झाले.

आनंद सुभाष नागसेठीया यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित वाघविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Embezzlement of Rs 1.5 lakh from a servant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app