चार लाखांचा डाळिंब खोक्यांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:40+5:302021-09-07T04:18:40+5:30

------------------------------- सायकली चोरणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा मालेगाव : शहरातील मित्रनगर भागातील सुखकर्ता अपार्टमेंटमधून दोन सायकलींची चोरी करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध कॅम्प ...

Embezzlement of four lakh pomegranate boxes | चार लाखांचा डाळिंब खोक्यांचा अपहार

चार लाखांचा डाळिंब खोक्यांचा अपहार

-------------------------------

सायकली चोरणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरातील मित्रनगर भागातील सुखकर्ता अपार्टमेंटमधून दोन सायकलींची चोरी करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शंकर कोंडीराम वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे भाऊ पाराजीत वाघमोडे यांच्या नावे असलेली प्रत्येकी १४ हजार रुपये किमतीच्या सायकली चोरून नेणाऱ्या संदीप सोमनाथ वाघ, विशाल जिभाऊ वाघ दोघे रा.पुंडलिकनगर, सोयगाव यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार डिंगर हे करीत आहेत.

------------------------------------

अनोळखी इसमाचा मृत्यू

मालेगाव : येथील उर्दू लायब्ररीसमोर चक्कर येऊन पडल्याने, ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. त्याला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: Embezzlement of four lakh pomegranate boxes