छत्रपतींच्या पुतळ्याभोवती सुशोभिकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:26 IST2020-02-17T22:29:42+5:302020-02-18T00:26:06+5:30

सिन्नर शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवतीच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगर परिषदेच्या २२ लाख रुपयांच्या फंडातून सदर काम करण्यात आले.

Embellishment around the statue of Chhatrapati | छत्रपतींच्या पुतळ्याभोवती सुशोभिकरणाचे काम

सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शुभोभिकरण कामाची पाहणी करताना माजी आमदार राजाभाऊ वाजे.

ठळक मुद्देसिन्नर : नगर परिषदकडून २२ लाखांचा निधी

सिन्नर : शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवतीच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगर परिषदेच्या २२ लाख रुपयांच्या फंडातून सदर काम करण्यात आले.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवती सुशोभिकरणाचे काम शिवकालीन ढंगाने करण्यात आले आहे. सुशोभिकरणाचे बहुतांश काम पूर्णत्वास गेले असून, शिवजयंती पूर्वी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या संकल्पनेतून पुतळा सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंदराव लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, विजय जाधव आदींनी कामाची पाहणी केली. माजी आमदार वाजे यांनी पुतळा सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली. नगरपरिषद फंडातून २२ लाख रुपये खर्चातून हे काम पूर्णत्वास येत आहे. शिवकालीन ढंगाची भिंत, बुरुज, पुतळ्यापर्यंतच्या पायऱ्या घडीव स्वरूपाच्या आहेत. पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात आली असून सुशोभीकरणाने चौकाला आकर्षक स्वरु प प्राप्त झाले आहे.

Web Title: Embellishment around the statue of Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.