स्वयंचलित फवारणी पंपाची शेतकऱ्यांना भुरळ

By Admin | Updated: September 30, 2014 22:20 IST2014-09-30T22:18:10+5:302014-09-30T22:20:48+5:30

खर्च कमी : १२ व्होल्टच्या बॅटरीवर चालतो चायना पंप

Embark on automatic spray pump farmers | स्वयंचलित फवारणी पंपाची शेतकऱ्यांना भुरळ

स्वयंचलित फवारणी पंपाची शेतकऱ्यांना भुरळ

येवला : स्वयंचलित फवारणी पंपामुळे सध्या ग्रामीण भागात चीन फेवरची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.भारतात कृषी क्षेत्रामध्ये रोज नवनवीन प्रयोग केले जातात. परंतु काही प्रयोग हे सर्वसामान्यांना परवडणारे नसतात. दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत असून मजुरांची कमतरता, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम उत्पादनावर होतो. शेतीमध्ये अधिक दर्जेदार पीक उत्पादनासाठी कीटकनाशके, विद्राव्यखते, बुरशीनाशके, तणनाशके यांची फवारणी करावी लागते जुन्यापद्धतीनुसार फवारणी करण्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो आणि वेळदेखील लागतो. यावर उपाय म्हणून बाजारात स्वयंचलित चायना औषध फवारणी पंप दाखल झाले आहेत.
येवल्यासह ग्रामीण भागात कृषी साहित्य विक्री दुकानांमध्ये औषध फवारणीसाठी अतिशय कमी खर्चात बॅटरीवर चालणारा चायना फवारणी पंप दाखल झाला आहे.
हा पंप १२ व्होल्टच्या बँटरीवर चालतो. सोबत चार्जरपण मिळते.
या पंपाची क्षमता १० ते १२ लीटर इतकी आहे. वजनाला हलका आहे.
स्वयंचिलत बटनामुळे चालू बंद करणे सोपे होते तसेच एकदा चार्ज केल्यानंतर ५ ते ६ तास चालतो आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चायना फवारणी पंपची किंमत सरासरी २०००, २५०० ते ३०००
रुपयापर्यंत आहे. काही नामांकित पंप उत्पादक कंपन्या बॅटरीसाठी ६ महिन्यांची वारंटीदेखील देतात त्यामुळे पारंपरिक हाताने दांडा हलवून फवारणी करण्यापेक्ष्या थोड्या मेहनतीत आणि कमी वेळात पिकांची औषध फवारणी करण्यासाठी आणि तो खरेदी करण्यासाठी या चायना फवारणी पंपकडे येवले तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
(वार्ताहर)

Web Title: Embark on automatic spray pump farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.