फास्टॅगमधील तांत्रिक त्रुटी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:06+5:302021-01-08T04:43:06+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोल भरताना वाहनांवर फास्टॅग असणे अनिवार्य करण्यात आले आहे, परंतु फास्टॅगबाबत अनेक तांत्रिक अडचणी असून, ...

Eliminate technical errors in Fastag | फास्टॅगमधील तांत्रिक त्रुटी दूर करा

फास्टॅगमधील तांत्रिक त्रुटी दूर करा

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोल भरताना वाहनांवर फास्टॅग असणे अनिवार्य करण्यात आले आहे, परंतु फास्टॅगबाबत अनेक तांत्रिक अडचणी असून, त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला विनाकारण झळ बसत आहे. घोटी टोल नाक्यावर वाहनधारकांनी टोल भरल्यास पडघा टोल नाक्यावर टोल आकारण्यात येत नव्हते, तसेच पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर परतीच्या प्रवासासह टोल एकदा भरल्यास टोलची रक्कम कमी आकारली जात होती व पुन्हा परतीला टोल आकारण्यात येत नव्हता, परंतु घोटी टोल नाक्यावर फास्टॅगद्वारे टोल आकारला गेल्यास, पडघा टोल नाक्यावर फास्टॅगच्या तांत्रिक त्रुटींमुळे पुन्हा टोल आकारला जात आहे, तसेच पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर परतीच्या प्रवासावेळी वाहनधारकांना जास्तीची रक्कम मोजावी लागत आहे. याकरिता फास्टॅगमधील तांत्रिक त्रुटी दूर केल्यावरच फास्टॅगचा वापर नाशिकमधील टोल नाक्यावर अनिवार्य करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जय कोतवाल, बाळा निगळ, नीलेश भंदुरे, सागर बेदरकर, संतोष जगताप, राहुल कमानकर, संदीप गांगुर्डे, दीपक पाटील, किरण पानकर, नीलेश सानप, नवराज रामराजे, हर्षल चव्हाण, योगेश आडभाई, अक्षय पाटील, अभिमन्यू गुडघे, संदीप खैरे, कल्पेश कांडेकर, राकेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Web Title: Eliminate technical errors in Fastag