शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:15 IST

सरकार व प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच गणेश मंडळांनी एकत्र येत एल्गार पुकारला. शनिवारी (दि.१८) गंगापूररोडवरील एका सभागृहात झालेल्या बैठकीत महापालिका, पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध जाचक अटी, नियमावलीचा निषेध नोंदविण्यात आला. पुणे, मुंबईप्रमाणे नाशिकलाही न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळ अशी पुनर्रचना करण्यात आली.

ठळक मुद्देगणेशोत्सव महामंडळाची पुनर्रचना : ‘तुम्ही साथ द्या, आम्ही सहकार्य करू’

नाशिक : सरकार व प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच गणेश मंडळांनी एकत्र येत एल्गार पुकारला. शनिवारी (दि.१८) गंगापूररोडवरील एका सभागृहात झालेल्या बैठकीत महापालिका, पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध जाचक अटी, नियमावलीचा निषेध नोंदविण्यात आला. पुणे, मुंबईप्रमाणे नाशिकलाही न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळ अशी पुनर्रचना करण्यात आली.महापालिका, पोलीस प्रशासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत घालण्यात आलेले निर्बंध, जाचक अटींबाबात चर्चा करण्यासाठी तसेच जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने सर्व गणेश मंडळांची बैठक समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर गजानन शेलार, शंकर बर्वे, निवृत्ती अरिंगळे, पद्माकर पाटील, अरुण काळे, सुरेश पाटील, लक्ष्मण धोत्रे, बबलू परदेशी, बबलू शेलार, पोपट नागपुरे, हेमंत जगताप, देवांग जानी, सत्यम खंडाळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली भूमिका थोडक्यात मांंडली.‘कायदा सुव्यवस्था’ शब्दाखाली संस्कृतीला सुरुंगभाजपा सरकारने महाराष्टÑाच्या धार्मिक संस्कृतीला कायदासुव्यस्था या गोंडस शब्दाखाली सुरुंग लावता कामा नये, असा सूर बैठकीत उमटला. शासन व प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत घालून दिलेले नियम शिथिल करावे, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. प्रशासनाने गणेश मंडळांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यास सर्व मंडळांचे कार्यकर्ते नक्कीच साथ देतील, अशी ग्वाही बैठकीच्या व्यासपीठावरून देण्यात आली.‘भालेकर’वरील बंदी हटवाभालेकर मैदानावर केवळ वाहनतळाचे विकासकाम सुरू आहे. कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी या मैदानात सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधींची वाहने उभी होती. त्यामुळे आहे त्या स्थितीत भालेकर मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यास महापालिकेला कुठलीही अडचण येता कामा नये. या मैदानावर गणेशोत्सवाला घातलेली बंदी त्वरित हटवावी, अशी मागणी यावेळी मंडळाच्या संतप्त पदाधिकाºयांनी केली.सण-उत्सवामागे ‘शुक्लकाष्ट’सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घातले गेलेले जाचक नियम, अटींचे ‘शुक्लकाष्ट’ तातडीने प्रशासनाने संपवावे. कोणत्याही मंडळाकडून कुठल्याहीप्रकारे नियम, कायद्याचा भंग केला जात नाही. महाराष्टÑाची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक मंडळामध्ये मूळ रहिवाशांचा समावेश आहे. पाहुण्यांनी स्थानिक नागरिकांना सण-उत्सव साजरे करण्यापासून रोखू नये, अशा तीव्र भावना यावेळी मंडळांच्या पदाधिकाºयांमधून उमटल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGaneshotsavगणेशोत्सव