शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

अकरा वर्षांनी झाली नांदगावची आमसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:40 IST

तब्बल ११ वर्षांनी नांदगावची आमसभा झाल्याने समस्याग्रस्त नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली आणि नागरिकांच्या आरोपांना उत्तरे देताना अधिकारीवर्गाची पुरती भंबेरी उडाली. गडबडलेल्या अधिकारी वर्गाची अनेकदा कानउघाडणी करण्याची वेळ आमदार सुहास कांदे यांचेवर आली. पंचायत समितीच्या नोंदीनुसार ७ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती.

ठळक मुद्देतक्रारींचा पाऊस : उत्तरे देताना अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

नांदगाव : तब्बल ११ वर्षांनी नांदगावची आमसभा झाल्याने समस्याग्रस्त नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली आणि नागरिकांच्या आरोपांना उत्तरे देताना अधिकारीवर्गाची पुरती भंबेरी उडाली. गडबडलेल्या अधिकारी वर्गाची अनेकदा कानउघाडणी करण्याची वेळ आमदार सुहास कांदे यांचेवर आली. पंचायत समितीच्या नोंदीनुसार ७ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती.लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तालुक्याच्या रथाची दोन चाके आहेत. जनतेच्या हितासाठी या दोन चाकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे. जनतेला त्रास झाल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आमदार सुहास कांदे यांनी आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील प्रशासनाला दिला. या आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्यावरील अन्यायास वाचा फोडली.यावेळी विविध शासकीय व निमशासकीय खात्यांचा आढावा आमसभेत घेण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाकडून माणिकपुंज गावासाठी सुमारे २ कोटी रु पयांचा निधी मंजूर असून ; आतापर्यंत फक्त ५३ लाख रुपयेच खर्च झाल्याची बाब साईनाथ रामकर यांनी उपस्थित करत योजनेअंतर्गत मिळालेले एलईडी बल्ब अधिकाºयांनी विकले असल्याचा आरोप केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत पाटील यांनी एकूण १२ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, मात्र सदर ठेकेदार काम सुरू करत नसल्याची बाब स्पष्ट केल्यानंतर आमदार कांदे यांनी सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न अनेकांनी मांडला. कांदाचाळी ऐवजी शेततळ्यांना प्राधान्य देण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली. भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या कामात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा ही चांगलाच गाजला. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत मुद्दा समोर आला. नांदगाव, मनमाड नगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत झालेल्या तक्र ारींना नगराध्यक्ष राजेश कवडे, मनमाडचे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांनी उत्तरे दिली. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, गणेश धात्रक, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, किशोर लहाने, संजय सांगळे, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,पंचायत समिती सदस्य सुमन निकम, अर्चना वाघ, विद्या पाटील, उपसभापती सुशीला नाईकवाडे, आदी उपस्थित होते.वनविभागावर आरोपतालुका वनविभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप खुद्द आमदार कांदे यांनीच केला तर एकीकडे लाखो रोपे वनविभागाने वाटली असल्याचा वनक्षेत्रपाल बोरसे यांचा दावा सामाजिक संस्थांनी खोडून काढला.वनपाल सोनवणे यांना हरणांनी नुकसान केलेल्या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप व वाळूच्याप्रकरणात निलंबित करावे अशी सुचना कांदे यांनीदिली.

टॅग्स :PoliticsराजकारणGovernmentसरकार