शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुथूट दरोड्यातील मुख्य सुत्रधार सुबोधसिंगसह अकरा संशयितांविरोधात लागणार मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 17:46 IST

उंटवाडीतील मुथूट फायनान्सवर १४ जून २०१९ सोने लूट करण्याच्या उद्देशाने दरोडा टाकणाºया सहा मुख्य आरोपी व दरोड्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच संशयितांसह अकरा संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास पाटील यांनी शुक्रवारी (दि.२६) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली. या दरोड्यातील प्रमुख सूत्रधार बिहारचा कुख्यात गुन्हेगार सुबोधसिंग याने बिहारमध्ये कारागृहातून या गुन्हाचा कट रचल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली असून, त्याचा प्रत्यार्पणासाठी नाशिक  पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

ठळक मुद्देमुथूट दरोड्यातीव आरोपींवर मोक्का लागणारपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची माहिती साजू सॅम्युअलवर गोळ्या झाडणारा आकाशसिंगला अटक

नाशिक : उंटवाडीतील मुथूट फायनान्सवर १४ जून २०१९ सोने लूट करण्याच्या उद्देशाने दरोडा टाकणाºया सहा मुख्य आरोपी व दरोड्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच संशयितांसह अकरा संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास पाटील यांनी शुक्रवारी (दि.२६) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली. या दरोड्यातील प्रमुख सूत्रधार बिहारचा कुख्यात गुन्हेगार सुबोधसिंग याने बिहारमध्ये कारागृहातून या गुन्हाचा कट रचल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली असून, त्याचा प्रत्यार्पणासाठी नाशिक  पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उंटवाडीतील मुथूट फायनान्सवरील दरोड्यातील लूट केलेला ऐवज वाहून नेण्यासाठी त्यांनी आयशर ट्रक (जीजे ०५, बीयू ८६५१) पेठरोडवर शहराच्या वेशीजवळ उभा केलेला होता. याच आयशरमधून चोरट्यांनी आशेवाडी येथे दुचाकी सोडून सुरतकडे पलायन केले होते. पोलिसांनी संबंधित वाहनाचा माग काढून ते ताब्यात घेत केलेल्या तपासात बिहारमधील कुख्यात गुन्हेगार सुबोधसिंह याने तेथील एका कारागृहातून या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. सुबोधसिंह यानेच दरोड्यातील आरोपितांना वाहनखरेदी पैसे दिले होते. पोलिसांनी यापूर्वी जितेंद्रसिंग विनयबहाद्दूरसिंग राजपूत व शार्पशूटर परमेंदर सिंग या दोघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील वाहनही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून अभियंता साजू सॅम्युअलवर गोळ्या झाडणारा आकाशसिंग विजयबहाद्दूर सिंग राजपूत (३०) यालाही अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार सुबोधसिंग याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सुरू असून, अन्य फरार संशयितांचाही पोलीस शोध घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मण पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले, सहायक पोलीसआयुक्त आर. आर. पाटील यांच्यासह आकाशसिंगला बिहारमधून जेरबंध करणारे पोलिसांचे पथक उपस्थित होते.  

१६ कोटींचे सोने लुटण्यासाठी दरोडाउंटवाडीतील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सुमारे १६ कोटी रुपयांचे सोने असल्याची माहिती या गुन्ह्यातील आरोपींना मिळाली होती. हे सोने  लुटण्यासाठीच त्यांनी दरोड्याचा कट रचून लुटलेल्या सोन्याची वाहतूक करण्यासाठीच आयशर वाहनाची तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी सुबोधसिंग याने दोन टप्प्यात जितेंद्रसिंग परमेंदरसिंग यांना पैसे दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरी