अकरा दिवसांनंतर कांदा लिलाव
By Admin | Updated: June 13, 2017 01:22 IST2017-06-13T01:21:45+5:302017-06-13T01:22:36+5:30
अकरा दिवसांनंतर कांदा लिलाव

अकरा दिवसांनंतर कांदा लिलाव
लासलगाव बाजार समिती : शेतकरी संपामुळे आवकेवर परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : गेल्या अकरा दिवसांपासून बाजार समितीतील कांदा आवक बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येथील मुख्य बाजार आवारात कांद्याची आवक पाहायला मिळाली. यामुळे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपाच्या काळात आर्थिक झळ सोसावी लागली. जिल्ह्यातील सर्व भागातील शेतकरी संपात सामील झाल्याने कांद्याची संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली होती. ३१ मे रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ४५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. ३१ मेच्या तुलनेने सोमवारी उन्हाळ कांद्याला १२० रु पये प्रतिक्विंटल जास्तने भाव मिळाला आहे.
शेतकरी संपामुळे ठप्प असलेल्या बाजार समिती आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी २५०, सरासरी ५७० तर जास्तीत जास्त ६८७ रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने लासलगाव बाजारपेठेत उत्साह दिसून आला. १५ हजार क्विंटल कांद्यांची आवक
शेतकरी संपामुळे शेतमाल न आल्याने १ जूनपासून बंद असलेले शेतमालाचे लिलाव सोमवारी पूर्ववत सुरू झाले. त्यामुळे बाजार समिती आवार गजबजल्याचे दिसून आले. सोमवारी लासलगाव बाजार समितीवर उन्हाळ कांद्यांची १५ हजार ८८५ क्विंटल एवढी आवक झाली.