साडेअकरा हजार जनावरे त्वचारोगाने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:19+5:302021-09-05T04:19:19+5:30
नाशिक जिल्ह्यातील साधारणत: ३७० गावांमध्ये या रोगाचा संसर्ग झाल्याचे प्राथमिक टप्प्यात आढळून आले असून, पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या ...

साडेअकरा हजार जनावरे त्वचारोगाने त्रस्त
नाशिक जिल्ह्यातील साधारणत: ३७० गावांमध्ये या रोगाचा संसर्ग झाल्याचे प्राथमिक टप्प्यात आढळून आले असून, पशुसंवर्धन विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे ११,४९१ जनावरांना त्याची लागण झाली आहे. वाऱ्याच्या वेगाने झपाट्याने पसरणाऱ्या या रोगामुळे पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरण हाती घेतले असून, ज्या ठिकाणी त्वचाराेगाची जनावरे आढळली त्यापासून पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण केले जात आहे. आतापावेतो ९२ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
चौकट====
लसीकरणासाठी निधीची चणचण
दरम्यान, त्वचारोगापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचे लसीकरण हाती घेण्यात आले असले तरी, लस खरेदीसाठी निधीची चणचण असल्याने काही प्रमाणात लसीकरणावर त्याचा परिणाम होत आहे. प्रारंभी पशुसंवर्धन विभागाकडे असलेल्या सेवाशुल्क निधीतून काही प्रमाणात लस खरेदी करण्यात आल्या असल्या तरी, हा निधी पुरेसा नसल्याने आता ग्रामपंचायतींना पंधरा हजार रुपयांपर्यंतची औषधी व लस खरेदी करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दले आहेत.
चौकट====
जनावरे खोल खड्ड्यात पुरावीत
त्वचारोगाने जनावरे दगावण्याचेही प्रमाण अधिक असल्याने त्याचा संसर्ग अन्य जनावरांना होऊ नये यासाठी संसर्गित जनावरे वेगळी ठेवण्यात येत आहेत, तसेच गोठा निर्जंतुक व स्वच्छ ठेवण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या आजाराने जनावरे दगावत असल्याने दगावलेलेीजनावरे आठ ते दहा फूट खोल खड्ड्यात पुरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.