शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुकणेचे काम झाल्याने विजेची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:06 IST

मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून गुरुत्वाकर्षामुळे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या योजनेतून अधिकाधिक पाणी उचलून शिवाजीनगरसह तत्सम बुस्टर पंपावरील उपशापोटी विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करण्याचे नियोजन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

नाशिक : मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून गुरुत्वाकर्षामुळे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या योजनेतून अधिकाधिक पाणी उचलून शिवाजीनगरसह तत्सम बुस्टर पंपावरील उपशापोटी विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करण्याचे नियोजन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी बुधवारी (दि.१५) मुकणे धरणाची पाहणी केली आणि जून महिन्याच्या आत धरणाच्या शिरोभागाचे काम करण्याचे निर्देश दिले आहेत.मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना ऐन उन्हाळ्यात सुरू झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. २६६ कोटी रुपयांच्या या योजनेअंतर्गत महापालिकेने १६ किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनने पाणी विल्होळी नाक्यावर आणले आहे. याठिकाणी महापालिकेने उंचावर जलशुद्धीकरण केंद्र बांधले आहे. तेथून पाणीपुरवठा केला जात आहे. गुरुत्वाकर्षामुळे उंचावरून सखल भागाला पाणीपुरवठा होत असल्याने जलकुंभांवरून पाण्याचा उपसा करून अन्य भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी बुस्टर पंपाचा उपयोग करण्याची गरज नाही. तसेच गंगापूर धरणाच्या ठिकाणाहून कमी पाणी उपसा झाला की त्यामुळेही विजेची बचत होणार आहे. त्यासाठी मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून पाण्याचा वापर वाढण्याची गरज आहे. सध्या १ मेपासून मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सुरुवातीला सात ते आठ दशलक्ष लिटर्स पाण्याचे वितरण करण्यात आले.महापालिकेच्या वतीने मुकणे धरणाचे पाणी हे केवळ पाथर्डी परिसरच नव्हे तर अगदी सिडकोतदेखील दिले जात आहे. त्यामुळे लवकरच अनेक भागातील जलवितरणाचे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :DamधरणelectricityवीजNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका