वीजप्रश्नी उद्योजकांची बैठक
By Admin | Updated: February 6, 2016 00:25 IST2016-02-06T00:24:28+5:302016-02-06T00:25:06+5:30
वीजप्रश्नी उद्योजकांची बैठक

वीजप्रश्नी उद्योजकांची बैठक
सातपूर : शासनाने फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांसाठी विजेच्या दरात सवलत जाहीर केल्याने उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांवर अन्याय केला असून या निर्णयाविरोधात रविवारी (दि. ७) निमात राज्यातील औद्योगिक संघटनांची बैठक बोलविण्यात आली आहे.
उद्योगमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी १९ जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या उद्योजकांच्या बैठकीत फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांसाठी विजेच्या दरात सवलत जाहीर केल्याने अन्य उद्योजकांवर अन्याय केला आहे. सद्य स्थितीत सर्व गुंतवणूक आणि सवलती फक्त विदर्भाला दिल्या जात आहेत. त्यामुळे नाशिकचे कारखाने बंद पडण्याची शक्यता आहे. शासनाच्या निर्णयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राज्यातील औद्योगिक संघटनांची ७ फेब्रुवारीला निमा कार्यालयात सकाळी सात ते दुपारी तीन वाजे दरम्यान बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत कोल्हापूर, बदलापूर, धुळे, जळगाव, ठाणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, रांजणगाव येथील औद्योगिक संघटना आणि महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा,अभियंता शाखेचे अध्यक्ष मनीष कोठारी, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, नाइसचे अध्यक्ष विक्र म सारडा आदि उपस्थित राहणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस मंगेश पाटणकर, ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी दिली. (वार्ताहर)