इंदिरा महिला बॅँकेत वीजबिल भरणा केंद्र सुरू
By Admin | Updated: June 29, 2014 00:34 IST2014-06-28T22:28:09+5:302014-06-29T00:34:11+5:30
इंदिरा महिला बॅँकेत वीजबिल भरणा केंद्र सुरू

इंदिरा महिला बॅँकेत वीजबिल भरणा केंद्र सुरू
ंमालेगाव : मामलेदार गल्ली येथील इंदिरा महिला सहकारी बॅँकेच्या मुख्य शाखेसह उमराणे व मालेगाव कॅम्प येथील शाखेत वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती बॅँकेच्या अध्यक्ष आशा खरे यांनी दिली. येथील मुख्य शाखेत वीजभरणा केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री डॉ. बळीरामजी हिरे यांच्या हस्ते व बॅँकेच्या संस्थापक इंदिराताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी नागरिकांना वीजबिल भरणा करणे सोयीचे होणार असून, परिसरातील नागरिकांनी बॅँकेत वीजबिल भरणा करण्याचे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमासाठी मोतीभवन येथील एमएसईबीचे अधिकारी एन. ओ. वाडीले, व्ही. जे. कांबळे, बु. एन. अहिरे, ए. जी. पवार, ए. एच. अहिवळे यांच्यासह बॅँकेचे जनरल मॅनेजर मोरे, रवि हिरे व सभासद उपस्थित होते.