शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कृषी धोरणामुळे विज बील निम्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 21:06 IST

येवला : महाराष्ट्र शासनाने कृषी धारकांसाठी कृषी धोरण २०२० आणले आहे. या कृषी धोरणामुळे महावितरणच्या कृषी धारकांचे थकीत वीजदेयक ...

ठळक मुद्देयेवला : धारकांनी लाभ घेण्याचे महावितरणकडून आवाहन

येवला : महाराष्ट्र शासनाने कृषी धारकांसाठी कृषी धोरण २०२० आणले आहे. या कृषी धोरणामुळे महावितरणच्या कृषी धारकांचे थकीत वीजदेयक जवळपास पन्नास ते साठ टक्के कमी होणार आहे. या धोरणाचा तालुक्यातील सर्व कृषी धारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता विनायक इंगळे यांनी केले आहे.कृषी पंप वीज जोडणी धोरण २०२० अंतर्गत रोहित्रावर लोड उपलब्ध असल्यास ३० मीटरचे आत असल्यास तत्काळ तर २०० मीटरपर्यंत केबलद्वारे वीज जोडणी करण्यात येणार आहे. रोहित्रावर लोड उपलब्ध नसल्यास रोहित्रावर लोड वाढवून, नवीन रोहित्र बसवून, २०० ते ६०० मीटर अंतर असल्यास फंडाचे उपलब्धतेनुसार ह्व्द्स अंतर्गत, ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर योजनेद्वारे वीज जोडणी देण्यात येणार आहे.यात दुसर्‍या व तिसर्‍या योजनेमध्ये तत्काळ जोडणी हवी असल्यास ग्राहकाने स्वखर्चाने काम करून घ्यावे लागेल मात्र, नंतर वीज देयकातून परतावा देण्यात येणार आहे. कृषी वीज देयकाची थकबाकी वसुलीबाबत सर्व उच्चदाब लघुदाब कृषी ग्राहक भाग घेण्यासाठी पात्र असून यात चालु थकबाकीदार व कायमस्वरूपी खंडित पीडी ग्राहक देखील पात्र आहेत.सदर सवलत येत्या ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. मागील कमाल ५ वर्षापर्यंतचे (सप्टेंबर २०१५) पर्यंत वीजदेयक दुरुस्ती केली जाणार असून, मागील ५ वर्षापर्यंतचे शंभर टक्के विलंब आकार व ५ वर्षापूर्वीचे विलंब आकार व व्याज शंभर टक्के माफ असणार आहे. सुधारित थकबाकी ३ वर्षासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत गोठविण्यात येऊन ग्राहकांच्या देयकांमध्ये वेगळी दर्शविण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगीतले.कृषी पंप देयक भरणा यासाठी साठी संस्थांना प्रोत्साहन मोबदला दिला जाणार आहे. तर पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे या योजने अंर्तगत गावनिहाय वसूला पैकी ३३ टक्के रक्कम गावातील लोंबकळणार्‍या तारा, वीज खांब, गाळे, तार, डीपी, रोहित्र यांचेसाठी खर्च करण्यात येणार आहे. तर वसूल झालेल्या रक्कमेच्या ३३ टक्के रक्कम जिल्हा स्तरावरील नवीन उपकेंद्र, वाहिन्या यांचेसाठी खर्च करण्यात येणार असल्याचेही इंगळे यांनी सांगीतले.

कृषिपंप धारकांची एकुण थकबाकी -उपविभाग एकुण ग्राहक रक्कम (करोडमध्ये) येवला शहर रहिवाशी, व्यवसायीक, औद्योगिक १२७२९ ४.३२, शेतीपंप १४००० ११०, येवला ग्रामीण शेतीपंप २०००० १५२.

टॅग्स :electricityवीजRural Developmentग्रामीण विकास