शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 18:30 IST

वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यांच्या वीज बिलात दुरूस्ती करण्यात यावे व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी

ठळक मुद्देग्राहक संरक्षण समितीकडे वीज कंपनीविरूद्ध तक्रारीवीज कंपनीने १२०० रूपये नुकसान भरपाई द्यावी

नाशिक : जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारीचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षापासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.या तक्रारींमध्ये प्रामुख्याने वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यांच्या वीज बिलात दुरूस्ती करण्यात यावे व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील वीज ग्राहक ठोंबरे यांना विजेचा पुरवठा करणारा वीज पोल पडला त्याबाबत विज कंपनीकडे तक्रार करूनही विजेचा पोल दुरूस्त करण्यात आला नाही. परिणामी वीज पुरवठा खंडीत झाल्याने ठोंबरे यांचे पीक बुडाले,त्यास वीज कंपनीच जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली असून, ठोंबरे यांनी तक्रार केल्यापासून प्रतिदिन वीज कंपनीने १२०० रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. वीज ग्राहकांचे हक्क व अधिकार तसेच भरपाईचे निश्चितीकरणाबाबत वीज कंपनीने त्यांच्या प्रत्येक वीज बिल भरणा केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालयांवर फलक लावावेत. त्याच बरोबर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिका-यांनी गणवेष परिधान करावा व त्यावर नेमप्लेट लावण्याचा नियम असून, तसे न केल्यास संबंधितांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु अधिकारी व कर्मचारी त्याचे पालन करीत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील ५२५ शेतकरी वीज ग्राहकांनी वीज पुरवठा सुरूळीत होत नसल्याबद्दल तक्रार केली असुनही अद्यापही वीज कंपनीने त्याची दखल घेतली नसल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वीज तक्रारींची तात्काळ सोडवणूक करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात आले,त्याच बरोबर बैठकीच्या इतिवृत्तात त्याची नोंद घेवून पुढच्या बैठकीत तक्रारींवर वीज कंपनीने काय कार्यवाही केली याचा अहवालही ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारNashikनाशिक