इलेक्ट्रिक वस्तंूच्या गुदामास आग

By Admin | Updated: September 2, 2014 01:13 IST2014-09-01T22:33:42+5:302014-09-02T01:13:01+5:30

इलेक्ट्रिक वस्तंूच्या गुदामास आग

Electric spatula fumes | इलेक्ट्रिक वस्तंूच्या गुदामास आग

इलेक्ट्रिक वस्तंूच्या गुदामास आग


देवळा : येथील इलेक्ट्रॉनिक्स वस्तंूच्या गुदामाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. देवळा -कळवण रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ज्ञानेश्वर नानाजी पवार यांचे वासू इलेक्ट्रॉनिक्स हे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदि वस्तूंच्या विक्रीचे दुकान आहे. दुकानाच्या बाजूलाच त्यांचे गुदाम आहे. सायंकाळी ६ वाजता या गुदामाला अचानक आग लागली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझविण्यासाठी मदतकार्य सुरू केले. शेजारी अहेर पेट्रोलपंप असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सटाणा येथून अग्निशमन दलाचा बंब बोलविण्यात आला. परंतु त्यापूर्वीच नागरिकांनी शर्थीचे
प्रयत्न करून आग आटोक्यात आणली होती. (वार्ताहर)

Web Title: Electric spatula fumes