वाळवणासाठी गच्चीवर गेलेल्या तिघा महिलांना विजेचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST2021-03-13T04:24:48+5:302021-03-13T04:24:48+5:30
गुरुवारी (दि.११) सकाळी हा प्रकार घडला. वाळवणासाठी खाट गच्चीवर टाकताना विजेचा प्रवाह सुरू असलेल्या तारांना खाटेचा ...

वाळवणासाठी गच्चीवर गेलेल्या तिघा महिलांना विजेचा शॉक
गुरुवारी (दि.११) सकाळी हा प्रकार घडला. वाळवणासाठी खाट गच्चीवर टाकताना विजेचा प्रवाह सुरू असलेल्या तारांना खाटेचा धक्का लागला. यामुळे अंजना गुलाब खैरनार (५७), निर्मला नंदलाल सोनवणे (४५) व तृप्ती राकेश खैरनार (२४) तिघेही रा. जाधवनगर या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी महिलांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी धाव घेऊन वीज प्रवाह खंडित करीत महिलांचे प्राण वाचवले. या प्रकाराची नगरसेवक मदन गायकवाड यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयात धाव घेतली तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात बोलवत धारेवर धरले. कॉलनी मधील लोंबकळणाऱ्या तारा ,तसेच गच्चीजवळील तार, घराजवळील विद्युत खांब याची तातडीने दुरुस्ती करावी अशा सूचना यावेळी कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या.