नगराध्यक्षपदाच्या निवडणुका १९ ला
By Admin | Updated: July 8, 2014 00:56 IST2014-07-08T00:39:33+5:302014-07-08T00:56:30+5:30
नगराध्यक्षपदाच्या निवडणुका १९ ला

नगराध्यक्षपदाच्या निवडणुका १९ ला
नाशिक : मुदतवाढ देऊन नंतर माघारी घेतलेल्या नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रितसर निवडणुकांची घोषणा जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केली असून त्यानुसार जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक आता १९ जुलै रोजी होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार १४ जुलै रोजी दुपारपर्यंत इच्छुकांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर १५ व १६ जुलै रोजी हरकती व आक्षेपांसाठी राखीव ठेवण्यात आला असून, १७ जुलै पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १८ जुलै रोजी माघारीची मुदत ठेवण्यात आली असून १९ जुलै रोजी विशेष सभा घेऊन नगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येईल. त्याच दिवशी उपनगराध्यक्षपदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल करता येतील व त्याच दिवशी उपनगराध्यक्षपदाची निवड होईल. जिल्ह्यातील सिन्नर, भगूर, येवला, नांदगाव, मनमाड व बागलाण या सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदाची मुदत नवीन अध्याध्येशानुसार ५ जुलैला संपुष्टात आली आहे.