निवडणूकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी

By Admin | Updated: June 20, 2014 22:03 IST2014-06-20T22:03:48+5:302014-06-20T22:03:48+5:30

निवडणूकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी

Before the elections, demand for reservation for Dhangar community | निवडणूकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी

निवडणूकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी

ब्राह्मणगाव : राज्यात धनगर समाज पूर्णपणे मागासलेला असून, विधानसभा निवडणुकांच्या आधी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. धनगर समाजास ज्या वेळेस जातीनिहाय आरक्षण जाहीर झाले तेव्हापासून धनगर समाज अनु. जमातीमध्ये होता; परंतु शब्द रचना करताना धनगरऐवजी धनगड असा उल्लेख झालेला असून, फक्त ‘र’ चा ‘ड’ झाल्याने हा धनगर समाज ६५ वर्षांपासून वंचित आहे. शासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरक्षणापासून वंचित असलेला धनगर समाज सामाजिक शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी ‘ड’ चा ‘र’ करुन धनगर समाजावर झालेला अन्याय दूर करावा व धनगर समाजाचा अनु. जमातीमध्ये येत्या निवडणुकीच्या आधी समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह विरोधी पक्षनेता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती अरुण शिरोळे, धर्मा पारखे यांनी दिली.

Web Title: Before the elections, demand for reservation for Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.