स्थायी सभापतिपदासाठी आज पालिकेत निवडणूक

By Admin | Updated: June 30, 2014 00:52 IST2014-06-30T00:45:21+5:302014-06-30T00:52:21+5:30

स्थायी सभापतिपदासाठी आज पालिकेत निवडणूक

Elections in the corporation today for standing post | स्थायी सभापतिपदासाठी आज पालिकेत निवडणूक

स्थायी सभापतिपदासाठी आज पालिकेत निवडणूक

 

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील बोलणी आज दिवसभर सुरू होती. रात्री उशिरापर्यंत याबाबतची खलबते सुरू असली तरी अद्यापही या दोहोंचीही भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. इकडे शिवसेनेने सभापतिपदासाठी जोरदार तयारी केली असताना त्यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक सकाळी ११ वाजता होणार आहे. सभापतिपदासाठी मनसेसह भाजपा आणि सेनेनेदेखील कंबर कसली असून, गेल्या दोन दिवसांपासून चर्चा आणि बैठकांचा जोर वाढला आहे. या पक्षांचे नेते आणि आमदारांनीदेखील यात लक्ष घातल्याने निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढलेली आहे. मात्र अद्याप एकाही पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पालिकेत मित्रपक्ष असले तरी भाजपा आणि मनसेकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे, तर या भांडणाचा लाभ उठविण्याचा प्रयत्न सेनेकडून होऊ शकतो, अशीही चर्चा होत आहे. मात्र, यात ऐनवेळी भाजपा आणि सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपासह शिवसेनेने सभापतिपदावर दावा सांगितला आहे, तर मनसेने यंदाही सभापतिपद आपल्याकडेच राखण्याचे मनसुबे आखले आहेत.
या सर्व धामधुमीत अपक्षांना सेनेची साथ लाभेल की नाही हे निव्वळ सेनेच्या भूमिकेवरच अवलंबून असणार आहे. परंतु सेनेने आपली कोणतीही भूमिका स्पष्टच केली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Elections in the corporation today for standing post