शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

विकासाच्या मुद्द्याभोवतीच रंगतेय निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:51 AM

कळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देकळवण-सुरगाणा: निवडणूक राग-रंगदुरंगी लढत : वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी बेरजेचे राजकारण

मनोज देवरेकळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.यंदाच्या निवडणुकीत स्व. ए. टी. पवार यांची उणीव भासत आहे. गेली ४५ वर्ष ए. टी. पवार यांना विकासाच्या बळावर हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात यश आले होते. मतदारांचेही त्यांना तितकेच सहकार्य मिळाले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत युती व आघाडी दुभंगल्याने मतविभागणीचा फटका पवार यांना बसला. गेल्या पाच वर्षांत मात्र विकासाचा वेग मंदावल्याने निवडणुकीत तोच मुद्दा प्रभावीपणे पुढे येताना दिसून येत आहे.यंदा पक्ष न पाहता विकासाचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. पाच वर्षांत समाधानकारक विकासकामे झाली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी ऐरणीवर आणला आहे. भाजपकडून इच्छुक राजेंद्र ठाकरे यांनी पक्षांतर करत मनसेकडून उमेदवारी केली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, शिवसेना, मनसे अशी चौरंगी लढत दिसत असली तरी खरा सामना दुरंगी होत आहे.मतदारसंघात पुनंद प्रकल्पातून सटाणा शहर पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेले काम, ओतूर धरणाचा रेंगाळलेला प्रश्न, कळवण शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आदी मुद्द्यावर विरोधक एकवटले आहेत. विकासाच्या मुद्द्यावरूनच आमदार जे. पी. गावित यांना विरोधकांनी घेरलं आहे. त्यामुळे गावितांच्या दृष्टीने यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ए.टी. पवार यांच्या निधनानंतर नितीन पवार यांनी सूत्रे हाती घेत कळवण पंचायत समिती, नगरपंचायत, बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे तसेच स्व. ए.टी. पवार यांची विकास पुरुष म्हणून असलेली प्रतिमा ही पवार यांची जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक विकासाच्या प्रमुख मुद्द्यावरच लढविली जात आहे. रिंगणातील उमेदवारही विकासाच्या मुद्द्यावर भर देत असल्याने लढतीत कोणाची सरशी होते, हे येणारा काळच सांगणार आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देयंदाच्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात ठप्प झालेली कामे, ओतूर धरणाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश.४पुनंद प्रकल्पातून सटाणा शहर पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेले काम, योजना रद्द करण्यात आलेले अपयश, कळवण शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था आदी मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.विकासाच्या मुद्दावर नेत्यांची दिलजमाईए. टी. पवार यांच्या कार्यकाळात झालेला विकासाचा मुद्दा यंदा प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच या मुद्््यावर काँग्रेस आघाडीमध्ये नेत्यांची दिलजमाई झाल्याचे चित्र दिसून येते. शिवाय कळवण शहरातील निर्णायक आघाडीही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. कळवण, सुरगाणा या दोन तालुकामिळून मतदारसंघ बनला आहे. मात्र यंदा कळवणमधून भुमिपूत्राचाही मुद्दा प्रभावीपणे पुढे आणला जात आहे. त्यामुळे माकपच्या उमेदवाराच्या दृष्टीने लढत प्रतिष्ठेची आणि अतिशय चुरशीची बनली आहे.बदललेली समीकरणेया मतदार संघावर ए. टी. पवार यांचे अधिराज्य होते. मात्र गेल्या निवडणुकीत आघाडी आणि युती वेगवेगळे लढल्याने मतविभागणीचा फटका मोठ्या प्रमाणावरचा फटका पवार यांना बसल्याचे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.दोन वर्षांपूर्वी ए. टी. पवार यांचे निधन झाले. त्यातच गेल्या पाच वर्षात कळवण आणि सुरगाणा तालुक्यात समाधानकारक विकासकामे झाली नसल्याची मतदारराजाची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार संघात पाणी, रस्ते हे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.यावेळेच्या निवडणूकीत जनतेच्या मनात असणारा कौल आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडी यावरच विजयाचे गणित ठरणार आहे. कळवण आणि सुरगाणा या दोन्ही तालुक्यात विकासाचे कार्ड प्रभावी ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalwan-acकळवणNCPराष्ट्रवादी काँग्रेस