त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
By Admin | Updated: March 22, 2016 23:29 IST2016-03-22T23:22:53+5:302016-03-22T23:29:14+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी (दि.१८) जाहीर करण्यात आली आहे. २९ मार्च ते २ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकूण ८४ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५२ ग्रामपंचायतींच्या मुदत जून,
जुलैमध्ये संपत आहेत. त्यापार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे, तर लगेच ३
वाजेनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तालुक्यातील तळवाडे, देवडोंगरा, चिंचओहळ, रोहिले, माळेगाव, हिरडी, पिंप्री, ब्राह्मणपाडे, ठाणापाडा, हातलोंढी, खैरायपाली, वरसविहीर, बेझे, वेळुंजे, शिरसगाव, अंबोली, धुमोडी, अंबई, बेरवळ, पेगलवाडी, वेळे, नांदगाव, गणेशगाव
वाखारी, खरवळ, तोरंगण, दलपतपूर, गडदवणे, कळमुस्ते, झारवड खुर्द, सामुंडी, गावठा, देवळा, भागओहळ, मुरंबी, सापतपाली, जातेगाव, चिंचवड, खडकओहळ, ओझरखेड, टाकेहर्ष, जातेगाव बु।।, अस्वली हर्ष,
मुळवड, कोणे, काचुर्ली, कळमुस्ते त्र्यंबक, तळेगाव त्र्यंबक, पिंपळद त्र्यंबक, अंजनेरी, मुळेगाव,
कोटंबी, रायते आदि ग्रामपंचायतींचा यात सामावेश आहे. (वार्ताहर)