वाहेगाव साळ सोसायटीची निवडणूक
By Admin | Updated: December 6, 2015 22:19 IST2015-12-06T22:18:20+5:302015-12-06T22:19:23+5:30
चांदवड : अवास्तव खर्चाला फाटा देण्यासाठी निवड बिनविरोध

वाहेगाव साळ सोसायटीची निवडणूक
तळेगाव रोही / वाहेगाव साळ : तालुक्यातील वाहेगाव साळ सोसायटीची निवडणूक अवास्तव खर्चाला फाटा देत बिनविरोध करण्यात आली.
सोसायटीच्या १३ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार होती. त्यासाठी बऱ्याच इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र दुष्काळी परिस्थिती बघता खर्चाला फाटा देत निवडणूक बिनविरोध करण्यात आली. त्यात सर्वसाधारण गटातून निवृत्ती न्याहारकर, सुधाकर न्याहारकर, रवींद्र खैरे, हरिचंद्र खैरे, भास्कर सोमवंशी, शिवाजी शिंदे, नामदेव खैरनार, केदू गांगुर्डे, तर महिला राखीव गटातून उषाबाई खैरे, सविता खैरे, अनुसूचित जाती गटातून प्रकाश पठाडे व अनुसूचित जमाती गटातून माधव गोसावी यांची निवड करण्यात आली. तानाजी खैरे, रतन रसाळ, विक्रम खैरे, बाबाजी खैरे, लीलाबाई बोरगुडे, भाऊसाहेब न्याहारकर, मनोहर वाढणे, श्रीराम खैरे, कमल न्याहारकर, शांताबाई नेटारे, रामहरी न्याहारकर यांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. पी. जाधव यांनी काम पाहिले. त्यांना शंकर ठाकरे सावळीराम सोमवंशी, बनेमिया शेख यांनी सहाय्य केले. निवडीसाठी वाहेगाव साळ येथील प्रतिष्ठांनी मदत केली. (वार्ताहर)