त्र्यंबक नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड
By Admin | Updated: September 25, 2016 23:38 IST2016-09-25T23:37:41+5:302016-09-25T23:38:07+5:30
त्र्यंबक नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड

त्र्यंबक नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीची विशेष सभा आज तहसीलदार महेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रत्येक विषय समितीमध्ये घ्यावयाचे सभासद यांची निवड बिनविरोध होऊन निवडलेल्या सभासदांमधून चार सभापतींची निवडही बिनविरोधरित्या पार पडली, तर उपनगराध्यक्षांकडे पदसिद्ध शिक्षण समितीच्या सभापती म्हणून नियुक्ती होत असते.
आजची सभा मावळते सभासद व सभापती असल्याने ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात दोन्हीही गटांना प्रतिनिधित्व मिळून पार पडली. त्र्यंबक नगरपालिकेच्या सभापती व समितीचे सभासद यांची मुदत संपल्याने आज नूतन विषय समित्यांचे सभासद व सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार महेंद्र पवार यांनी, तर सहायक पिठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरुरे यांनी काम पाहिले. या सभेत खालीलप्रमाणे सभासद व सभापती निवडण्यात आले. आता या समित्या शेवटच्याच राहणार असूृन पुढील वर्षी डिसेंबरमध्ये नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. दोन महिने अगोदर त्यांचे अधिकार आचारसंहितेमुळे कमी होतील. (वार्ताहर)
महिला व बाल कल्याण समिती सभापती- अंजना मधुकर कडलग, सदस्य- शकुंतला धनंजय वाटाणे, सिंधुबाई दत्ता मधे, यशोदा सुनील अडसरे, तृप्ती पंकज धारणे.
आरोग्य व वैद्यकीय यात्रा-जत्रा समिती सभापती- धनंजय यादवराव तुंगार, सदस्य- यशवंत धर्मा भोये, अभिजित मधुकर काण्णव, ललित बाळासाहेब लोहगावकर.
बांधकाम समिती सभापती- रवींद्र मोहन गमे, सदस्य- रवींद्र शांताराम सोनवणे, आशा माधव झोंबाड, तृप्ती पंकज धारणे.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती- अनघा नारायण फडके, सदस्य- यशोदा सुनील अडसरे, आशा माधव झोंबाड, योगेश विश्वनाथ तुंगार.
शिक्षण समिती (पदसिद्ध समिती जी उपाध्यक्षांकडे असते) सभापती तथा उपनगराध्यक्ष- संतोष सदाशिव कदम, सदस्य- ललित बाळासाहेब लोहगावकर, अभिजित मधुकर काण्णव.
बिनविरोेध, यात्रा-आरोग्य- धनंजय तुंगार, बांधकाम- रवींद्र गमे, पाणीपुरवठा- अनघा फडके, महिला व बालकल्याण- अंजना कडलग, उपाध्यक्ष व शिक्षण- संतोष कदम