मालेगाव मनपाच्या प्रभाग सभापतींची १४ जुलैला निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST2021-07-10T04:11:52+5:302021-07-10T04:11:52+5:30

प्रभाग १, २ व ३ मध्ये दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग १ मध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा कल्पना वाघ यांना ...

Election of Malegaon Municipal Corporation Ward Chairpersons on 14th July | मालेगाव मनपाच्या प्रभाग सभापतींची १४ जुलैला निवड

मालेगाव मनपाच्या प्रभाग सभापतींची १४ जुलैला निवड

प्रभाग १, २ व ३ मध्ये दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग १ मध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा कल्पना वाघ यांना संधी दिली आहे. प्रभाग १ मध्ये सभापतीपदासाठी सेनेच्या वाघ व भाजपाचे भरत बागुल यांच्यात लढत होणार आहे. प्रभागातील संख्या बळानुसार पुन्हा एकदा सेनेच्या वाघ यांची प्रभाग समिती सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. प्रभाग २ मध्ये सय्यद शबानाबानो सय्यद अकील व शेख रजियाबी शेख इस्माईल यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग ३ मध्ये अब्दुल अजीज अब्दुल सत्तार व अन्सारी मो.साजिद अ.रशीद यांच्यात लढत होणार आहे. १४ जुलै रोजी प्रभागनिहाय ऑनलाइन विशेष महासभा घेण्यात येणार आहे. सभेच्या २० मिनिटे आधी सदस्यांना लिंक पाठविली जाणार आहे. प्रभाग १ साठी सकाळी ११ वाजता, प्रभाग २ साठी दुपारी १२ वाजता, प्रभाग ३ साठी १ वाजता व प्रभाग ४ साठी साडेतीन वाजता मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित राहणार आहेत. त्यांना महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव श्याम बुरकुल साहाय्य करणार आहेत.

Web Title: Election of Malegaon Municipal Corporation Ward Chairpersons on 14th July