ब्राह्मणगाव सोसायटीची निवडणूक जाहीर
By Admin | Updated: March 19, 2016 22:56 IST2016-03-19T22:52:02+5:302016-03-19T22:56:14+5:30
ब्राह्मणगाव सोसायटीची निवडणूक जाहीर

ब्राह्मणगाव सोसायटीची निवडणूक जाहीर
ब्राह्मणगाव : येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्र म जाहीर झाल्याने राजकीय घडमोडीस वेग आला आहे. १३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
निवडणुकीत दोन किंवा तीन पॅनल निर्मितीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- उमेदवारी अर्ज दाखल करणे- दि. १९ ते २२ मार्च, अर्ज छाननी- दि. २२ मार्च, उमेदवारी अर्ज यादी प्रसिद्ध करणे- दि. २८ मार्च, उमेदवारी अर्ज माघार- २८ मार्च ते ११ एप्रिल, चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध- १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर २४ एप्रिलला सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.
मतदानानंतर लगेच मतमोजणी केली जाईल. त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करतील. दुष्काळी परिस्थिती, संस्थेची वसुली पाहता निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे; मात्र राजकीय घडामोडी पाहता निवडणूक अटी-तटीची होण्याची शक्यता आहे. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल, असे प्रा. के. एन. अहिरे यांनी सांगितले. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी रामराव अहिरे, बाळासाहेब अहिरे, किशोर पाटील यांनी अर्ज दाखल केले. (वार्ताहर)