आयमा निवडणूक बिनविरोध; ३० रोजी घोषणा

By Admin | Updated: May 23, 2014 01:07 IST2014-05-23T00:27:31+5:302014-05-23T01:07:42+5:30

सिडको : आयमा निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी कार्यकारिणी सदस्यांच्या चार सदस्यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट झाले असून, येत्या ३० रोजी बिनविरोध निवडीची घोषणा केली जाणार आहे. यंदा सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने निवडणुकीतील चुरसही संपुष्टात आली आहे.

The election of AIMA is unconstitutional; Declaration on 30th | आयमा निवडणूक बिनविरोध; ३० रोजी घोषणा

आयमा निवडणूक बिनविरोध; ३० रोजी घोषणा

सिडको : आयमा निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी कार्यकारिणी सदस्यांच्या चार सदस्यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट झाले असून, येत्या ३० रोजी बिनविरोध निवडीची घोषणा केली जाणार आहे. यंदा सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने निवडणुकीतील चुरसही संपुष्टात आली आहे.
आयमा निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांचा प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. परंतु कार्यकारिणी सदस्यांच्या १९ जागांसाठी एकूण २३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यापैकी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम.जे. चंद्रशेखर यांनी सांगितले.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून विवेक पाटील, उपाध्यक्ष वरुण तलवार, सचिव राजेंद्र अहिरे, मानद सचिव उन्मेश कुलकर्णी, व्यंकटेश मूर्ती, खजिनदार निखिल पांचाल यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून राधाकृष्ण नाईकवाडे, उत्तम दोंदे, विनायक मोरे, सुखबीरसिंग भोंगल, एन.टी. गाजरे, सौमित्र कुलकर्णी, प्रकाश ब्राšाणकर, उमेश कोठावदे, सुदर्शन डोंगरे, विजय जोशी, कैलास वराडे, बाळासाहेब गुंताल, एन.डी. ठाकरे, ललित बूब, प्रमोद वाघ, नीलिमा पाटील, दिलीप बोरावले, पुनितसिंग छाबरा, दिलीप वाघ यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे मानले जात आहे.
आज अर्ज माघार घेतलेल्यांमध्ये सुनील जाधव, अविनाश मराठे, अनिल डोंगरे, राजेंद्र कोठावदे यांचा समावेश आहे. येत्या शनिवारी होणार्‍या वार्षिक सभेत कार्यकारिणी निवडीची घोषणा होणार आहे.(वार्ताहर)

Web Title: The election of AIMA is unconstitutional; Declaration on 30th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.