१७३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:46 IST2017-09-02T00:46:19+5:302017-09-02T00:46:30+5:30
नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७३ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.

१७३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
नाशिक : नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७३ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दोन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचे ठरविले असून, तसे आदेशही काढण्यात आले आहे. नाशिक विभागाचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. निवडणुका होणाºया ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची थेट निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना ७ सप्टेंबर रोजी जारी करण्यात येणार असली तरी, दुपारी आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याने या ठिकाणी नवीन कामांचे उद्घाटन, भूमिपूजन, राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, बैठकांवर निर्बंध लादण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी १५ ते २२ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करण्याची मुदत असून, २५ रोजी छाननी, २७ रोजी निवडणुकीतून माघारीचा अंतिम दिवस आहे. त्याच दिवशी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ७ आॅक्टोबर रोजी मतदान व ९ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.