विखरणी ग्रामपंचायत उपसरपंचपदी अरु ण खरे यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:18 IST2019-06-25T18:17:33+5:302019-06-25T18:18:03+5:30

येवला : विखरणी येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी अरु ण गंगाधर खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Elected unanimous election of Arun Khare as Vishwani Gram Panchayat Deputy Chief Minister | विखरणी ग्रामपंचायत उपसरपंचपदी अरु ण खरे यांची बिनविरोध निवड

नविनर्वाचित उपसरपंच अरु ण खरे यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर.

ठळक मुद्देअरु ण खरे यांची निवड होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.

येवला : विखरणी येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी अरु ण गंगाधर खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आवर्तन पद्धतीने सगुणा महेश बिडगर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली. अरु ण खरे यांची निवड होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.
पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते नविनर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खैरे यांनी कामकाज पाहिले, तर केशव पगार यांनी त्यांना सहकार्य केले.
या निवडीप्रसंगी सरपंच रामदास खुरसने, वाल्मिक शेलार, रामा खुरसने, न्यायाबाई शेलार, दत्तू शेलार, महेश बिडगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Elected unanimous election of Arun Khare as Vishwani Gram Panchayat Deputy Chief Minister