शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

क्रूझर-दुचाकी अपघातात वृद्ध महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:56 IST

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा शिवारात क्रूझर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देननाशी : वाहनांची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा शिवारात क्रूझर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास गिरीधर राठोड (२३), मयूरी गिरीधर राठोड (२०) रा. टापूपाडा ता. सुरगाणा आणि पार्वताबाई बळवंत पवार (६५) रा. धोंडाळपाडा, ता. दिंडोरी हे (एम. एच. १८ एल ५०५५) दुचाकीने ननाशीकडून धोंडाळपाड्याकडे जात असताना गावाच्या अलीकडे समोरून येणारी क्रूझर (एम. एच. १४ जी. एच. ७४०३) आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवर बसलेल्या पार्वताबाई पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीधर राठोड आणि मयूरी राठोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.जखमीपैकी गिरीधर यास जबर मुका मार लागला असून तर मयूरी हिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उशीरे, पाटील, पोलीस नाईक मोरे, गावित आदी पुढील तपास करीत आहेत.(०३ ननाशी)धोंडाळपाडानजीक अपघातातील अपघातग्रस्त दुचाकी.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू