शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात वृद्धाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 02:09 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकाने गोंधळ घातल्याने मंगळवारी संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाने कर्मचाऱ्याचा हात पिरगाळुन धक्काबुक्की केल्यामुळे पंजाच्या एका बोटाचे हाड फ्रॅक्चर होऊन दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देकर्मचाऱ्याचे बोट फ्रॅक्चर : पोलिसांकडून गुन्हा दाखल

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकाने गोंधळ घातल्याने मंगळवारी संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाने कर्मचाऱ्याचा हात पिरगाळुन धक्काबुक्की केल्यामुळे पंजाच्या एका बोटाचे हाड फ्रॅक्चर होऊन दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतिश छगन भोईर (४०) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित अशोककुमार कुंदणलाल भाटीया यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. अतिश यांच्या फिर्यादीनुसार लसीकरण केंद्रावर कर्तव्य बजावत असताना सायंकाळी साडे चारच्या सुमारास संशयित भाटीया व एक महिला व ३० ते ३५ वयोगटातील तरुणासह केंद्रावर आले. त्यांनी लस घेण्यासाठी आलो असल्याचे सांगत आरोग्य सेतु ॲपवरील मेसेज दाखिवला. ‘आजचे दिवसभरातील लसीकरण पुर्ण झाले आहे, त्यामुळे तुम्ही उद्या या’ असे फिर्यादी आतीश यांनी सांगितले. त्यामुळे संशयित भाटीया संतापले आणि शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. ‘मला आताच लस द्या...’असा आग्रह धरला. यावेळी ‘वरिष्ठांनी परवानगी दिल्यास आम्ही लस देऊ’असे अतिश यांनी सांगितल्यानंतर ज्येष्ठ नागरिकासोबत असलेल्या युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. त्यास विरोध केला असता ज्येष्ठ नागरिकाने अतिश यांचा हात पिरगाळला तसेच अरेरावी करीत गोंधळ घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, वैद्यकीय चाचणी केली असता बोटाचे हाड मोडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अतिश यांनी भाटीया विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी