शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रहिवाशांमध्ये दहशत : दोनवाडे गावात बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:47 IST

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूर जवळील दोनवाडे येथील रहिवाशी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्यासुमारास ...

ठळक मुद्देसव्वा महिन्यात दोन दुर्घटना तीन पिंजरे तैनात; ट्रॅप कॅमेरे बसविणार

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूर जवळील दोनवाडे येथील रहिवाशी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्यासुमारास साखरझोपेतच हल्ला चढविल्याची घटना सोमवारी (दि.१५) उघडकीस आली. सव्वा महिन्यापुर्वी घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या एका चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात याच गावात प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दोनवाडे गावात जीवराम ठुबे हे आपल्या शेतीतील घरात एकटेच राहत होते. रविवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास झोपडीवजा घरात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार मारले आणि त्यांच्या मृतदेहाचा काही मांसल भाग खाऊन प्रेत लगतच्या नाल्याजवळ सोडून दिल्याचे सकाळी उघडकीस आले. जीवराम हे मळ्यातील घराच्या पडवीत झोपत असत मात्र उकाडा जाणवत असल्याचे ते पडवीचा दरवाजा उघडा ठेवत होते. सोमवारी सकाळी ८ वाजता ठुबे यांचा नातू सागर हा आजोबाना चहा घेऊन पडवीत आला असता घराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग दिसून आले .आजोबा घरात नसल्याचे बघून सागरन दोनवाडे गावातील घरी येऊन वडील दत्तू ठुबे यांना माहीती दिली. दत्तु ठुबे व परिसरातील काही नागरिकांनी मळ्यात धाव घेतली. घरात सांडलेले रक्त बघून त्यांनी नाल्याकडे धाव घेतली. तेथे जीवराम यांचा मृतदेह त्यांना आढळून आला.पोलीस पाटील संपत वाघ यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व वनविभागाला तात्काळ घटनेची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे ,वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.मयत जीवराम ठुबे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, चार मुले असा परिवार आहे.--तीन पिंजरे तैनात; ट्रॅप कॅमेरे बसविणारदोनवाडे गावच्या मळे परिसरात बिबट-मानव संघर्ष उभा राहिला आहे. या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने तत्काळ शेताच्या बांधांलगत तीन पिंजरे अभ्यासपुर्ण पध्दतीने तैनात केले आहे. दोनवाडे मळे परिसरात वनविभाग व इको-एको फाउण्डेशनचे वन्यजीवप्रेमींकडून सर्व पाहणी करून ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार आहे. याद्वारे बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच बिबट हल्ल्यातील काही नमुनेदेखील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागDeathमृत्यूnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद