शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

वृध्द भुधारकाची निर्घृणपणे हत्या : रम्मी-जिम्मी राजपुत यांना सात दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 14:34 IST

कधी पंजाब तर कधी हरियाणा आणि नंतर हिमाचलप्रदेश, उत्तराखंड या राज्यांत ठावठिकाणे बदलणाऱ्या या दोघा संशयितांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमधून आवळल्या.

ठळक मुद्देभुमाफियांच्या टोळीने रचला होता हत्येचा कटआठवडाभर पथक पंजाब, हिमाचलमध्ये

नाशिक : आठ महिन्यांपुर्वी गंगापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथे एका वृध्द भुधारकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यामागे भुमाफियांच्या टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तेव्हापासून टोळीप्रमुख रम्मी परमजितसिंग राजपुत, जिम्मी परमजितसिंग राजपुत हे दोघेही संशयित आरोपी फरार झाले होते. गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने त्यांना अटक करुन गुरुवारी (दि.७) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पुढील गुरुवारपर्यंत (दि.१४) दोघांना पोलीस कोठडी सुनावली. .

जागेच्या व्यवहारातून भुमाफियांच्या टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने संघटितपणे कट रचून भुधारक रमेश मंडलिक (७०) यांचा काटा फेब्रुवारी महिन्यात काढला होता. यासाठी एका होमगार्डला सुपारी देण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत १४ संशयित आरोपींना गजाआड केले आहे. टोळीप्रमुख रम्मी-जिम्मी हे दोघेही बंधू नाशिक शहरातून नव्हे तर राज्यातून अन्य राज्यांत पसार झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते; मात्र वायफायद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहत सातत्याने कधी पंजाब तर कधी हरियाणा आणि नंतर हिमाचलप्रदेश, उत्तराखंड या राज्यांत ठावठिकाणे बदलणाऱ्या या दोघा संशयितांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमधून आवळल्या. टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या गळाला लागल्याने भूमाफीयांना जबर हादरा बसला आहे. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वैयक्तिक लक्ष घालत पर्दाफाश केला होता. त्यांच्याविरुध्द मोक्काअन्वये कारवाई केली आहे.जिल्हा सत्र न्यायालयात सरकारपक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. सुधीर कोतवाल यांनी युक्तीवाद केला. उच्च न्यायालयासह अपर पोलीस महासंचालकांकडूनही मोक्काच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले गेले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ हे करीत आहेत.---

आठवडाभर पथक पंजाब, हिमाचलमध्येतांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या 'लोकेशन'च्या दिशेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक दिनेश खैरनार, विष्णू उगले, जाकीर शेख, अंमलदार येवाजी महाले, प्रशांत मरकड, महेश साळुंके, नीलेश पवार यांच्या पथकाने मार्गस्थ होत पंजाब गाठले. चंदीगड, अमृतसरमध्ये आठवडाभर तळ ठोकून तेथे शोध घेतला. तसेच तेथून हरियाणाच्या काही शहरांमध्ये रम्मी-जिम्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने केला, मात्र दोघांनी पलायन करत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश गाठल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने त्या दिशेने कूच केली. सर्वप्रथम जिम्मी यास उत्तराखंडच्या रामनगरमधून ताब्यात घेतल्यानंतर हिमाचलमधून रम्मीच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक