असमान निधी वाटपाविरोधात महिला सदस्यांचा एल्गार गुप्त बैठक
By Admin | Updated: March 10, 2015 01:18 IST2015-03-10T01:17:14+5:302015-03-10T01:18:21+5:30
असमान निधी वाटपाविरोधात महिला सदस्यांचा एल्गार गुप्त बैठक

असमान निधी वाटपाविरोधात महिला सदस्यांचा एल्गार गुप्त बैठक
नाशिक : जिल्हा परिषदेत १३व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीवरील व्याजाच्या ८० लाख रुपयांचे दोघा पदाधिकाऱ्यांनी परस्पर नियोजन केल्यावरून सदस्यांमध्ये असंतोषाचे वातावरण धुमसत असून, काल (दि.९) जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवासस्थानी सर्वपक्षीय महिला सदस्यांची एक तातडीची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत निधी वाटपाच्या धोरणाबाबत सर्व महिला सदस्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. तसेच येत्या सर्वसाधारण सभेत १३ तारखेला त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, सर्वपक्षीय महिला सदस्य सभागृहात एकाच ठिकाणी बसणार असून, त्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे कळते. दुसरीकडे अर्थ व बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी आपण सभापती असल्याने आपल्या विभागाचे निर्णय आपणच घेणार आहोत, मात्र सभागृहात सदस्य जे ठरवितील तेच महत्त्वाचे राहील, शेवटी सभागृहाचा निर्णय अंतिम असतो, असे सांगत एकप्रकारे गुगली टाकली आहे. काही सदस्यांनी नियोजनाचा अधिकार उपाध्यक्षांना देण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषद चार चौघे सदस्यच चालवित असल्याचे व नियोजन परस्पर तेच करत असल्याने काही सदस्यांमध्ये या सर्वांविरोधात असंतोष खदखदत होता. आता त्यातच सर्वपक्षीय महिलांची अचानक बैठक झाल्याने व निधी वाटपात सर्वच गटांना समान न्याय देण्याची मागणी या सर्वपक्षीय महिला सदस्यांनी केल्याने त्याला एकाकी पडलेल्या काँग्रेसकडून पाठबळ लाभण्याची चिन्हे आहेत. कारण सत्तेत कॉँग्रेस वगळता सर्वच पक्ष सहभागी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी महिला सदस्यांच्या मागणीला कॉँग्रेसकडून पाठबळ लाभू शकते. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही जिल्हा परिषद सदस्यांमध्येही या असमान निधी वाटपावरून व ८० लाखांचे परस्पर नियोजन केल्यावरून नाराजी पसरली आहे. त्यामुळे १३ व २७ तार