एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक
By Admin | Updated: February 24, 2017 23:31 IST2017-02-24T23:30:57+5:302017-02-24T23:31:18+5:30
आदिवासींचा उत्सव : खामखेडा, पिळकोस, ब्राह्मणगाव येथे कार्यक्रम

एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खामखेडा येथील वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अण्णा पाटील, पोलीसपाटील गोरख सोनवणे, पाटील गुरुजी यांनी वीर एकलव्य जीवनकार्याविषय उपस्थित बांधवाना माहिती दिली. यानंतर वीर एकलव्य यांच्या तैल चित्राचे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातून घरोघरी वीर एकलव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अण्णा पाटील, सुनील शेवाळे, योगेश सोनवणे, गुलाब सोनवणे, माजी सरपंच उखड्याबाई पवार, गोरख सोनवणे, वामन सोनवणे, नानाजी पवार, नानाजी सोनवणे, दीपक मोरे, कैलास गांगुर्डे, पार्वताबाई पवार, वाणूबाई सूर्यवंशी आदि सहभागी झाले होते. सरपंच आक्काबाई पवार, माजी सरपंच पंडित पवार ,ग्रामपंचायत सदस्य देवीदास पवार, यशोदाबाई गांगुर्डे, नंदू पवार, आक्काबाई सोनवणे, बाबाजी मोरे, जंगलू मोरे, दोधा पवार, दीपक पवार यांनी एकलव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर एकलव्य प्रतिमेची आदिवासी वाद्य संबळ, ढोलकी पावरी यांवर संपूर्ण गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)