आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत आठ संघांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:35 IST2019-02-08T15:35:01+5:302019-02-08T15:35:08+5:30
नाशिक: रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल आयोजित रासबिहारी इंटरस्कूल फूटबॉल कप या आंतरशालेय स्पर्धेत शहरातील आठ शाळांच्या संघांनी सहभाग घेतला आहे.

आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत आठ संघांचा सहभाग
ठळक मुद्दे दि.१२ ते १५फेब्रुवारी दरम्यान या १४ वर्षाआतील मुलांच्या फूटबॉल स्पर्धा रासबिहारी स्कूलच्या मैदानावर होणार आहेत.
नाशिक: रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल आयोजित रासबिहारी इंटरस्कूल फूटबॉल कप या आंतरशालेय स्पर्धेत शहरातील आठ शाळांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. दि.१२ ते १५फेब्रुवारी दरम्यान या १४ वर्षाआतील मुलांच्या फूटबॉल स्पर्धा रासबिहारी स्कूलच्या मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेत फ्रावशी इंटरनॅशनल, गोल्डन होरायझन, स्वामी नारायण स्कूल,इस्पॅलियर्स स्कूल, न्यू इरा, नवरचना,जेम्स, आणि रासबिहारी स्कूल या शाळांचा समावेश आहे. अशी माहिती रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापक बिंदू विजयकुमार यांनी सांगितले.