एकाच रात्रीत फोडली आठ दुकाने

By Admin | Updated: October 28, 2015 23:19 IST2015-10-28T23:16:24+5:302015-10-28T23:19:51+5:30

पिंपळगाव बसवंत : व्यापारी धास्तावले

Eight shops broke down in one night | एकाच रात्रीत फोडली आठ दुकाने

एकाच रात्रीत फोडली आठ दुकाने

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथे मंगळवारी एकाच रात्रीतून आठ दुकाने फोडण्यात आली. त्यामुळे व्यापारीवर्ग धास्तावला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपळगाव बसवंत येथील सोमनाथ देवालयाजवळ पत्र्यांचे गाळे असून, मंगळवारी रात्री चोरट्यांनी दुकानावर चढून कात्रीने पत्रा कापून दुकानामधील रोख रक्कम लंपास केली. एकाच महिन्यात या भागातील ही दुसरी घटना आहे. संभाजी गायकवाड यांचे मोबाइल दुकान, ओम किराणा, सुभाष जैन यांचे दुकान, श्री एंटरप्रायजेस, अ‍ॅक्टिव मोबाइल, अनंता एंटरप्रायजेस आदि दुकानांचे पत्रे कापून चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली.
या भागात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ही दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. पिंपळगाव ग्रामपंचायतीने या भागात कॅमेरे बसविण्याची मागणी व्यापारीवर्गाकडून होत आहे. पिंपळगावात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत. बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Eight shops broke down in one night