शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

आठ जणांचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: August 29, 2015 00:14 IST

कारवाई : निवडणूक खर्च सादर करण्यास टाळाटाळ

अभोणा : कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, १० उमेदवारांना पुढील पाच वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी हा आदेश दिला आहे. तालुक्यात २२ एप्रिल रोजी २५ ग्रामपंचायतींच्या २६१ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. यातील बिनविरोध निवड झालेल्या १२९ उमेदवारांनी तसेच निवडणूक लढविलेल्या ४०० उमेदवांनी तहसीलदार कार्यालयात ठरवून दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे गरजेचे होते. मात्र निवडणूक निकालानंतर २९० उमेदवारांनीच निवडणूक खर्च सादर केल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर ११० सदस्यांना २४ एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयाने निवडणूक खर्च करण्यासाठी नोटीस बजावली होती. याची दखल घेत ९२ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला. मात्र उर्वरित १८ उमेदवारांनी खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे तहसील विभागाने यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आठ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले असून, १० उमेदवारांना पाच वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची कारावाई केली आहे. खर्डे दिगरचे तीन, पुनदनगरचे दोन, तर शिवभांडणे, धार्डेदिगर व गोळाखालचा येथील प्रत्येकी एक सदस्याचा समावेश आहे तर बंदी घातलेल्या १० उमेदवारांमध्ये खर्डे दिगरचे चार, दळवट व पुनदनगर येथील प्रत्येकी दोन व शिवभांडणे व भांडणे (हा.) येथील प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)