दहावीच्या आठ ‘डमी’ विद्यार्थ्यांना अटक

By Admin | Updated: March 17, 2016 23:06 IST2016-03-17T23:04:41+5:302016-03-17T23:06:57+5:30

दहावीच्या आठ ‘डमी’ विद्यार्थ्यांना अटक

The eight 'dummy' students of class 10 are arrested | दहावीच्या आठ ‘डमी’ विद्यार्थ्यांना अटक

दहावीच्या आठ ‘डमी’ विद्यार्थ्यांना अटक

इगतपुरी : भरारी पथकाची कारवाईइगतपुरी : शहरातील महात्मा गांधी विद्यालयात सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रातून आठ ‘डमी’ विद्यार्थ्यांना नाशिक येथील शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने पेपर लिहिताना पकडल्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
गुरुवारी इतिहास-राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. महात्मा गांधी विद्यालयात बोगस (डमी) विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून पेपर लिहित असल्याची तक्रार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अज्ञात व्यक्तीने केल्यामुळे उपशिक्षण अधिकारी एस. जी. मंडलिक यांनी परीक्षा केंद्रावर धाडसत्र कारवाई केली असता रवींद्र आडोळे याच्या जागी डमी दुर्गेश काशीनाथ भागडे परीक्षार्थी मिळून आला. सखोल चौकशी केल्यामुळे आणखी सात बोगस विद्यार्थी मिळून आले. यात मोहन झोलेच्या जागी डमी विद्यार्थी किरण भुरबडे, सुभाष बोंडेच्या ऐवजी डमी विद्यार्थी प्रमोद रामचंद्र बोंडे, गोरखनाथ डोकेऐवजी डमी विद्यार्थी दिनकर वाघ, कैलाश भगतच्या ऐवजी डमी विद्यार्थी रमेश चौधरी, काशीनाथ आगविलेच्या ऐवजी डमी साईनाथ शिंदे, गोरखनाथ चव्हाणच्या ऐवजी एक डमी विद्यार्थी पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. के. सहारे, विनोद गोसावी, संतोष गांगुडे, समाधान केदारे, मधुकर खुळे, रामदास गांगुर्डे, संध्याराणी कोकाटे आदि करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: The eight 'dummy' students of class 10 are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.