शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

क्रूझरचे टायर फुटून अपघातात आठ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 1:04 AM

बागलाण तालुक्यातील किकवारी येथून नाशिक येथे लग्नसमारंभासाठी निघालेल्या क्रूझरचे टायर फुटून गाडी दुभाजक ओलांडून पलीकडून जात असलेल्या बसवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये आठजण ठार, तर सहा गंभीर जखमी झाले.

नाशिक : बागलाण तालुक्यातील किकवारी येथून नाशिक येथे लग्नसमारंभासाठी निघालेल्या क्रूझरचे टायर फुटून गाडी दुभाजक ओलांडून पलीकडून जात असलेल्या बसवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये आठजण ठार, तर सहा गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि. २३) सकाळी शिरवाडे वणीजवळील खडकजांब शिवारात झालेल्या या अपघातात सहा महिलांचा जागीच, तर दोघांचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.  बागलाण तालुक्यातील किकवारी येथील एकाचे नाशिक येथे लग्न होते. त्यासाठी गावातील नागरिक क्रूझर गाडीतून (क्र. एमएच १५ ईबी ३६१९) निघाले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्यानजीक सकाळी ११.१५च्या सुमारास क्रूझरचे पुढील टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्रूझर थेट दुभाजकावरून शेजारच्या रस्त्यावर गेली. याच वेळी नाशिक - सटाणा बस या रस्त्यावरून जात होती. या धावत्या बसवर कू्रझर आदळली आणि भीषण अपघात झाला. त्यातच मागून येणारी इनोव्हा  कारही या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन आदळली.  या अपघातामध्ये  धनुबाई केदा काकुळते (६५) , तेजश्री साहेबराव शिंदे , करूणाबाई बापू शिंदे, सरस्वतीबाई नथू जगताप (सर्व रा. किकवारी), रत्ना राजेंद्र गांगुर्डे (४५) रा. डांगसांैदाणे, क्रुझर चालक अशोक पोपट गांगुर्डे (रा.कळवण) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमी शोभा संतोष पगार (४०), सिद्धी विनायक मोरे (१४) दोघी रा. किकवारी यांचे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पिंपळगाव बसवंत खाजगी रूग्गालयात यश प्रकाश पगारे (८), सरला प्रकाश पगारे (३६) दोघे रा.मुंजवाड.ता.बागलाण, शंकर चिंधू काकुळते (५०), रिना शशिकांत जगताप (३२) दोघे रा.किकवारी कल्याणी कृष्णा शिंदे (४०) रा. कडाणे, ता.बागलाण, मयूर ज्ञानेश्वर नवले यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले . सायंकाळी उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामुळे चारही गावांवर शोककळा पसरली आहे.या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी, अपघातग्रस्त क्रुझरमध्ये सुमारे सतरा प्रवासी होते. या गाडीचे टायर कच्चे होते. पुढील टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून गाडी बाजुच्या रत्यावर गेली. याचवेळी समोरून बस आल्याने मोठा अपघात झाला. 

टॅग्स :Accidentअपघात