अल्पवयीन चोरट्याकडून आठ सायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:52+5:302021-03-04T04:26:52+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सायकल चोराच्या मागावर होते. एक अल्पवयीन मुलगा महागडी सायकल ...

अल्पवयीन चोरट्याकडून आठ सायकली जप्त
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सायकल चोराच्या मागावर होते. एक अल्पवयीन मुलगा महागडी सायकल अवघ्या पाचशे रुपयांत विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे प्रभाकर पवार यांना मिळाली. दरम्यान, पवार यांनी त्वरित पथकासोबत संशयित मुलगा ज्या ठिकाणावर येणार तेथे सापळा रचला. काही वेळेत संशयित अल्पवयीन चोरटा तेथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. दरम्यान, त्याने इंदिरानगर परिसरातून आठ महागड्या सायकलींची चोरी करून त्या पंचवटी येथील गणेशवाडी आणि वडाळा गावातील घरकुल इमारतीमध्ये विक्री केल्याची माहिती दिली. दरम्यान, त्याला सोबत घेत पोलिसांनी त्या ठिकाणांहून विक्री केलेल्या चोरीच्या आठ सायकली हस्तगत केल्या. या कारवाईमध्ये सौरभ माळी, दत्तात्रेय गवारे, भाऊसाहेब ठाकरे यांनी सहभाग घेतला. ज्या तक्रारदारांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत, त्यांनी ओळख पटवून इंदिरानगर पोलीस ठाण्यातून आपली सायकल घेऊन जावी, असे आवाहन माईनकर यांनी केले आहे.
---
फोटो आर वर ०१इंदिरानगर नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
010321\530101nsk_65_01032021_13.jpg
===Caption===
अल्पवयीन चोरट्याकडून आठ सायकली जप्त