रस्ता लुटीतील साडे आठ लाखांची रोकड व्यापाऱ्याला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST2021-04-04T04:14:12+5:302021-04-04T04:14:12+5:30

गेल्या ५ डिसेंबर २०२० रोजी कापूस व्यापारी सुनिष श्रावण चौधरी यांना अज्ञात चोरट्यांनी रस्त्यात अडवून ...

Eight and a half lakh cash returned to the trader in the road robbery | रस्ता लुटीतील साडे आठ लाखांची रोकड व्यापाऱ्याला परत

रस्ता लुटीतील साडे आठ लाखांची रोकड व्यापाऱ्याला परत

गेल्या ५ डिसेंबर २०२० रोजी कापूस व्यापारी सुनिष श्रावण चौधरी यांना अज्ञात चोरट्यांनी रस्त्यात अडवून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, लाकडी दांडक्याने मारहाण करून रोकड असलेली बॅग चोरून नेली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून तीन महिन्यांनंतर या प्रकरणी खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (२२, रा. मोहाडी), हृतिक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (१९, रा. पवननगर), अविनाश सुरेश माने (२२, रा. धुळे) या तिघांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ८ लाख ४७ हजार ५०० रुपये व एक दुचाकी जप्त केली आहे. जप्त केलेली रोकड कापूस व्यापारी चौधरी यांना परत करण्यात आली आहे.

Web Title: Eight and a half lakh cash returned to the trader in the road robbery