पांगरीजवळ आयशर उलटल्याने म्हैस ठार
By Admin | Updated: April 3, 2017 00:50 IST2017-04-03T00:50:03+5:302017-04-03T00:50:13+5:30
पांगरी : औरंगाबाद छावणी येथे विक्रीसाठी म्हशी घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी झाल्याने एक म्हैस ठार, तर एक म्हैस जखमी झाल्याची घटना घडली

पांगरीजवळ आयशर उलटल्याने म्हैस ठार
पांगरी : औरंगाबाद छावणी येथे विक्रीसाठी म्हशी घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी झाल्याने एक म्हैस ठार, तर एक म्हैस जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील पांगरीजवळ हॉटेल पंचकृष्णसमोर हा अपघात झाला.
बासनी डेअरी, जब्बारपाडा, वसई येथून महेसाणा जातीच्या सात, सुरती जातीच्या दोन व मुरा जातीची एक अशा दहा म्हशी आयशर टेम्पोमधून (क्र. एमएच ०४, एचएस ९४०) औरंगाबाद छावणी येथील बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होत्या.
आयशर टेम्पो पांगरी शिवारात आला असता समोरून आलेल्या छोटा हत्ती वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात झोल मारल्याने आयशर रस्त्याच्या कडेला उलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात महेसाणा जातीची एक म्हैस ठार झाली, तर
एक जखमी झाली आहे.
येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. ए. अहेर यांनी घटनास्थळी येऊन जखमी म्हशीवर उपचार केले. (वार्ताहर)