शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

बकरी ईदचे नमाजपठण आपआपल्या घरीच करा : नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:08 IST

सामुहिकरित्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर राज्य सरकारकडून पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देआयुक्तालयात मुस्लीम धर्मगुरूंसोबत बैठक

नाशिक : कोव्हिड-१९ अर्थात कोरोना संक्रमणाचा फैलाव शहर व परिसरात अधिक वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीत समाजबांधवांनी सामुहिकरित्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.बकरी ईद (ईद-ऊल अज्हा) येत्या शनिवारी (दि.१) शहरात साजरी केली जाणार आहे. यावर्षी रमजान ईदप्रमाणेच बकरी ईदवरदेखील कोरोनाचे गडद सावट आहे. सध्या अनलॉकची स्थिती जरी असली तरी सामुहिकरित्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर राज्य सरकारकडून पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. यानिमित्ताने नांगरे पाटील यांनी शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्तालयात बुधवारी (दि.२९) मुस्लीम धर्मगुरूं सह जुने नाशिक, वडाळागाव भागातील काही मशिदींचे विश्वस्तांची बैठक बोलविली होती. यावेळी नांगरे पाटील यांनी बकरी ईदच्या संदर्भाने राज्य शासनाकडून आलेल्या नियमावली व आदेशाची माहिती दिली. सामुहिकरित्या कोठेही नमाजपठणासाठी गर्दी होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी तसेच बाजारातसुध्दा खरेदी-विक्रीकरिता झुंबड उडणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी धर्मगुरूंकडून नमाजपठण व स्लाटर हाऊसची मागणी ठेवण्यात आली; मात्र शासनाच्या आदेशानुसार या मागण्यांना कुठल्याहीस्तरावर मान्यता देता येणार नसल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, मंगलसिंह सुर्यवंशी, यांच्यासह मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, रजा अकादमीचे एजाज रजा मकरानी, सलीम पटेल, एकबाल पटेल, लालाभाई शाह, निजामुद्दीन कोकणी आदि उपस्थित होते.ईदगाहवरील सोहळा रद्दशहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर होणाऱ्या बकरी ईदच्या नमाजपठणाचा सामुहिक सोहळा रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी आपआपल्या घरांमध्येच नमाजपठण करावे. शासनाच्या कुठल्याही नियमांचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन हिसामुद्दीन खतीब यांनी समाजाला केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलBakri Eidबकरी ईदShajahaani Eidgahशाहजहांनी इदगाह