नाशिक :इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. जुने नाशिकमधून बुधवारी (दि.२१) ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मुख्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावरील आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेतले.ईद-ए-मिलाद हा सण मुस्लीम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी यानिमित्ताने मशिदींसह घरे, दुकाने व परिसरात सजावट करण्यात येते. मागील आठवडाभरापासून शहरातील मुस्लीम बहुल भागात लगबग पहावयास मिळत होती. दुपारी पावणेचार वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीला चौकमंडई येथील जहांगीर मशिदीपासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी खतीब व शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर खतीब यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या संरक्षण तथा प्रगतीसाठी विशेष दुआ मागितली.
ईद-ए-मिलाद : नाशिकमध्ये अभूतपूर्व उत्साहात ‘जुलूस-ए-मुहम्मदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 18:55 IST
‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक चौकमंडई येथून पारंपरिक मार्गाने हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली.
ईद-ए-मिलाद : नाशिकमध्ये अभूतपूर्व उत्साहात ‘जुलूस-ए-मुहम्मदी’
ठळक मुद्देसहभागी मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून शिस्तबध्द संचलन दुरूदोसलाम, नात-ए-रसूलचे पठण पहाटेपासून मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रममानवजातीच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या प्रगतीसाठी विशेष दुआ