उंटवाडीतील मर्चंट बँकेतून रोकड पळविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 11, 2016 23:50 IST2016-06-11T23:48:21+5:302016-06-11T23:50:05+5:30
उंटवाडीतील मर्चंट बँकेतून रोकड पळविण्याचा प्रयत्न

उंटवाडीतील मर्चंट बँकेतून रोकड पळविण्याचा प्रयत्न
नाशिक : नाशिक मर्चंट को-आॅप. बँकेच्या उंटवाडी रोडवरील शाखेतून दोन संशयितांनी बँकेतील महिला कर्मचाऱ्याच्या ताब्यातील रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली़
रात्री आठ वाजेच्या सुमारास बँकेच्या कर्मचारी प्रतिभा भुजबळ या मुख्य शाखेतून कागदपत्रे घेऊन बँकेत आल्या असता त्यांच्या पाठीमागून दोन बुरखाधारी संशयित आले व त्यातील एकाने भुजबळ यांचे तोंड दाबून पैशांची मागणी केली़ तर दुसऱ्याने बँकेच्या रोखपाल छाया सिरसाठ याच्या केबिनमध्ये घुसून पैसे काढण्याचा प्रयत्न केला़ यावेळी जाधव यांनी आरडाओरड केल्याने बँकेचे कर्मचारी मदतीसाठी धावले़
बँकेचे कर्मचारी नरेंद्र भालेराव यांनी प्रसंगावधान राखत एका संशयितास पकडण्याचा प्रयत्न केला़ मात्र या दोघांनी त्यांच्यावर हल्ला करून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले़